Sunday, December 31, 2017

शब्दचित्र - माझी गांधीगिरी

मी पूर्वी पेठेत राहायचो तेव्हाची गोष्ट. पेठेतल्या लाईफबद्दल आधीच्या एका लेखात बरंच लिहिलं आहेच, पण त्यातला हा किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो. कारण त्यावेळी मी जसा वागलो त्याबद्दल मलाच माझा खूप अभिमान वाटला.

आमच्या वाड्यात बहुदा सगळ्या लोकांना आमच्याबद्दल तिरस्कार होता. तिथे एखाद्या माणसाबद्दल मत तयार होण्यासाठी तो माणूस कोण आहे यापेक्षा त्याचं आडनाव काय आहे याला जास्त महत्व होतं. आणि आपलं आडनाव आपल्या हातात नसतं. त्यामुळे आणि मी त्या लोकांमध्ये मिसळत नसल्यामुळे माझ्यावर विशेष राग असणं ओघानंच आलं.

आमच्या वाड्यात त्यातल्यात्यात माझा अती द्वेष करणारा एक प्राणी होता. माझ्यापेक्षा ७-८ वर्षांनी मोठा. बापाच्या जीवावर ऐश करणं आणि बायकोला मारहाण करून पुरुषार्थ दाखवणं हे त्याचे मुख्य उद्योग. आमच्या कुरापती काढणं आणि आमच्या नावानं आणि आमच्या जातीच्या नावानं शिव्यांच्या लाखोल्या वाहणे हे फावल्या वेळचे उद्योग. कधी याचं डोकं फिरेल आणि तोंडाचं गटार वाहायला लागेल याचा नेम नसायचा.

एकदा मी खूप दमून कॉलेजमधून घरी आलो होतो. जेवायला बसतच होतो की बाहेरून आमच्या आई-बहिणींचा उद्धार चालू झाला. माझं माथं भडकलं. मी दरवाजा उघडून बाहेर आलो आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. तो चिडून माझ्या अंगावर धावून आला. मी त्याच्यावर तुटून पडलो. जोरदार गुद्दागुद्दी सुरू झाली. एवढ्यात त्याची आई आवाज ऐकून बाहेर आली आणि तिनं त्याला घरात ओढून नेला.

या नंतर २-३ दिवस गेले. मी काही कामासाठी आमच्या गल्लीतल्या एका दुकानात गेलो होतो. दुकान कसलं, एक छोटी टपरी होती. या टपरीच्या समोरच याच्या एका मित्राची पानाची टपरी होती. तिथे हा प्राणी त्याच्या काही रिकामटेकड्या मित्रांबरोबर चकाट्या पिटत बसलेला असायचा. या दोन्ही दुकानांच्या मधला रस्ता जास्तीत जास्त २०-२५ फुटी होता.

मी त्या समोरच्या दुकानात उभा असताना मागून माझं नाव कुणीतरी बोललेलं ऐकू आलं. मी मागे वळून पाहिलं तर हा प्राणी आणि त्याचे मित्र माझ्या नावानं शिव्या घालत होते. माझ्या डोक्यात एक सणक गेली. मनात आलं की असाच रस्ता पार करून त्याच्या कानाखाली आवाज काढावा. पण मी स्वतःला आवरलं. ते ७-८ जणं होते. मी एकटा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते सगळेच रिकामटेकडे होते. त्यांच्यापुढे कोणतंही ध्येय नव्हतं. मला पुढे करिअर करायचं होतं. त्या गटारी लोकांच्या पातळीला उतरायला माझ्याकडे वेळही नव्हता आणि तशी इच्छाही नव्हती. मी काहीतरी रीऍक्ट करावं आणि त्यांना मला बडवायला निमित्त द्यावं हीच त्यांची अपेक्षा होती.

डोक्यात प्रचंड नपुंसक संताप घेऊन मी घरी आलो. दिवसभर माझी चिडचिड होत होती.

दुसऱ्या दिवशी मी परत त्या टपरीसमोरून चाललेलो असताना पुन्हा एकदा माझ्या नावानं शिव्या आल्या. परत एकदा माझा दिवस खराब झाला होता. तुफान चिडचिड होत होती. घरी पोचलो आणि एक मोठा श्वास घेतला. शांतपणे विचार केला. लहानपणी आई मला नेहमी सांगायची ते आठवलं ... "लोक आपल्याला काय बोलतात यापेक्षा आपण त्याला किती महत्व देतो हे महत्वाचं".

दुसऱ्या दिवशी मनाचा एक निश्चय करून बाहेर पडलो. मुद्दामच त्या टपरीच्या समोरून चालत गेलो. अपेक्षेप्रमाणे माझ्या नावानं शिव्यांची लाखोली ऐकू आली. मी निग्रहानं चेहरा कोरा ठेवून शांतपणे तिथून पुढे गेलो. दहा मिनिटांनी परत त्याच रस्त्यानं आलो. परत एकदा शिव्या आल्या. पण यावेळी त्यातला जोर किंचित कमी झाल्याचं जाणवलं आणि मला लक्षात आलं कि आपली मात्रा लागू पडतीये!

पहिल्या दिवशी त्या शिव्या येत असताना चेहरा कोरा ठेवण्यासाठी मला बराच अभिनय करावा लागला होता. पण दुसऱ्या दिवसापासून मी ते चक्क "एन्जॉय" करायला सुरुवात केली! बाहेर पडलो की आवर्जून मी त्या टपरीसमोरून जायला सुरुवात केली. आता तर तिथून जाताना आपोआप माझ्या ओठांवर एक स्मितहास्य यायला लागलं, कारण आता माझं आधीचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यांवर मला दिसायला लागलं होतं! आपल्या शिव्या आणि चिडवण्याचा समोरील व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही म्हणल्यावर त्यात काही मजाच रहात नाही ना!

पुढच्या २ दिवसांत मी मुद्दाम कमीतकमी दहा-पंधरा वेळा त्या टपरीसमोरून गेलो असेन. लवकरच ती सगळी रिकामटेकडी टाळकी माझा नाद सोडून त्यांच्या नेहमीच्या चकाट्या पिटण्यात गुंतली.

त्यानंतर काही वर्षांत स्वतःचा फ्लॅट घेऊन त्या वाड्यातून बाहेर पडलो आणि परत त्या वाड्याचं आणि तिथल्या लोकांचं तोंड पाहिलं नाही. पण माझी ही  "गांधीगिरी" माझ्या चांगलीच लक्षात राहिली!

Top

My Gandhigiri


This story is from the 20th century (which ended only 18 years ago). Before 2000, me and my family used to live in a run down, ramshackle old wada in the old part of Pune.  And it was not only the building that was outdated and dirty. Competing with that was the mindset of people around me, who had no aspirations, no goals in life, and plenty of time in their hands.


The life was worse than living in a slum. I will write about that sometime later. But for now, I want to share a story about my “Gandhigiri” for which I am still proud.


Many of my neighbors were of the type who judged a person not from his conduct, or character, but from his surname. And they had plenty of hatred for my surname!


Among those morons, there was a special moron. He had a very special hatred for me. He was older to me by 7-8 years. His main job was to spend his father’s money on booze, and to prove his manliness by regularly beating up his wife. His side job was to start unprovoked quarrels with us by abusing us (and our caste) in the choicest of words. And this abuse would start any time of the day or night, because he had all the time in his hands, being jobless.


One day, as I had just returned from college and getting ready to have my lunch, the abuses began. This time, the abuse included some choicest words about my mother. My temper hit the roof and I ran out to confront him. This is just what he wanted. He physically assaulted me. I hit back, very hard. Shortly after that, his mother came running to pacify him and forced him inside the house.


Two of three days past this incident, I went to a shop nearby my house. This was a small shop on one side of the road. On the other side of this road, about 20-25 feet away, was a paan shop, which belonged to the father of the moron mentioned above.


As I was talking to the shopkeeper, I realized that my name was being called out. I turned back to see who was calling me. And there he was, with a bunch of his friends, sitting near the paan shop, hurling abuses at me.


Once again, I had a strong urge to confront him and even thrash him. But I knew that this is exactly what they wanted. They were more than five goons, while I was alone. Most importantly, none of these goons had any career and future prospects or any goals. They had nothing to lose, while I had a lot!


So, I turned back and headed home, my head throbbing with impotent anger.


A couple of days after this incident, I walked the same street again, and came across the same gang, who promptly started hurling abuses at me. I was again furious, but could do nothing.


When I came back that day, I was close to breaking down. I was afraid even when going out of my house. And I could foresee no end to this abuse until I gave them a chance to thrash me.


Or was there?


Yes, there would be, if I could think out of the box and showed some restraint.


Next day, I came out, head high, and walked straight past the paan shop where the dreaded gang was sitting. As expected, when I reached the paan shop, there was a slurry of abuses thrown at me. I kept walking with a slight smile on my face (which was extremely difficult in the face of such abuse, mind you).


Exactly 10 minutes after this, I made it a point to again walk in front of the paan shop, with a smile on my face. Again I heard the abuses, but could sense the enthusiasm slipping a bit. This was hint enough for me.


From that day onwards, wherever I would go, I would make it a point to walk in front of the paan shop with my head high and a smile on my face. Within a couple of days, the goons got increasingly frustrated with my attitude. I could see it clearly on their faces. Soon, they lost all interest in me, and started ignoring me when I approached the shop.


In a few years past this incident, we left that wada and its “culture” behind us for good, but I am still proud of this Gandhigiri of mine, executed when even the word “Gandhigiri” was not invented yet.

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...