Tuesday, February 27, 2018

गिधाडं

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर ज्याप्रकारे व्हॅट्सऍपवर जोक्स येत आहेत ते पाहून पुरेपूर पटलं की भारतीय लोकांची विनोदबुद्धी बरीच जोरदार आहे! आता जेव्हां कुणीतरी आपल्या देशावर, राज्यावर, गावावर, धर्मावर किंवा आवडत्या राजकारण्यांवर विनोद करेल तेव्हा ही विनोदबुद्धी आणि खेळकर वृत्ती अशीच शाबूत ठेवूया. जे लोक कुणाच्यातरी मृत्यूवर हसू शकतात ते कोणत्याही परिस्थितीत सुखी राहू शकतात याची मला खात्री आहे!

ताजा कलम : गेले दोन तीन दिवस बातम्यांची वेगवेगळी रूपं पाहून डार्विनची "evolution theory" साफ खोटी असल्याची खात्री झाली. माणसाची उत्क्रांती माकडापासून नव्हे तर गिधाडांपासून झाली असं आता माझं ठाम मत आहे!!


For my non-Marathi friends:

After Sridevi's death, I see many jokes about her and the circumstances of her death circulating on WhatsApp. These jokes prove that we Indians have a great sense of humor! Let's have this same sense of humor when someone jokes about our country, state, religion or our favorite politician. And we definitely can, because we have this special gift of laughing even over others' deaths!

P.S.: After watching the news channels for a couple of days, I am convinced that Darwin's theory of evolution is a total hoax! I now think that Humans evolved not from apes, but vultures!!

I rest my case!

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...