Sunday, December 31, 2017

शब्दचित्र - माझी गांधीगिरी

मी पूर्वी पेठेत राहायचो तेव्हाची गोष्ट. पेठेतल्या लाईफबद्दल आधीच्या एका लेखात बरंच लिहिलं आहेच, पण त्यातला हा किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो. कारण त्यावेळी मी जसा वागलो त्याबद्दल मलाच माझा खूप अभिमान वाटला.

आमच्या वाड्यात बहुदा सगळ्या लोकांना आमच्याबद्दल तिरस्कार होता. तिथे एखाद्या माणसाबद्दल मत तयार होण्यासाठी तो माणूस कोण आहे यापेक्षा त्याचं आडनाव काय आहे याला जास्त महत्व होतं. आणि आपलं आडनाव आपल्या हातात नसतं. त्यामुळे आणि मी त्या लोकांमध्ये मिसळत नसल्यामुळे माझ्यावर विशेष राग असणं ओघानंच आलं.

आमच्या वाड्यात त्यातल्यात्यात माझा अती द्वेष करणारा एक प्राणी होता. माझ्यापेक्षा ७-८ वर्षांनी मोठा. बापाच्या जीवावर ऐश करणं आणि बायकोला मारहाण करून पुरुषार्थ दाखवणं हे त्याचे मुख्य उद्योग. आमच्या कुरापती काढणं आणि आमच्या नावानं आणि आमच्या जातीच्या नावानं शिव्यांच्या लाखोल्या वाहणे हे फावल्या वेळचे उद्योग. कधी याचं डोकं फिरेल आणि तोंडाचं गटार वाहायला लागेल याचा नेम नसायचा.

एकदा मी खूप दमून कॉलेजमधून घरी आलो होतो. जेवायला बसतच होतो की बाहेरून आमच्या आई-बहिणींचा उद्धार चालू झाला. माझं माथं भडकलं. मी दरवाजा उघडून बाहेर आलो आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. तो चिडून माझ्या अंगावर धावून आला. मी त्याच्यावर तुटून पडलो. जोरदार गुद्दागुद्दी सुरू झाली. एवढ्यात त्याची आई आवाज ऐकून बाहेर आली आणि तिनं त्याला घरात ओढून नेला.

या नंतर २-३ दिवस गेले. मी काही कामासाठी आमच्या गल्लीतल्या एका दुकानात गेलो होतो. दुकान कसलं, एक छोटी टपरी होती. या टपरीच्या समोरच याच्या एका मित्राची पानाची टपरी होती. तिथे हा प्राणी त्याच्या काही रिकामटेकड्या मित्रांबरोबर चकाट्या पिटत बसलेला असायचा. या दोन्ही दुकानांच्या मधला रस्ता जास्तीत जास्त २०-२५ फुटी होता.

मी त्या समोरच्या दुकानात उभा असताना मागून माझं नाव कुणीतरी बोललेलं ऐकू आलं. मी मागे वळून पाहिलं तर हा प्राणी आणि त्याचे मित्र माझ्या नावानं शिव्या घालत होते. माझ्या डोक्यात एक सणक गेली. मनात आलं की असाच रस्ता पार करून त्याच्या कानाखाली आवाज काढावा. पण मी स्वतःला आवरलं. ते ७-८ जणं होते. मी एकटा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते सगळेच रिकामटेकडे होते. त्यांच्यापुढे कोणतंही ध्येय नव्हतं. मला पुढे करिअर करायचं होतं. त्या गटारी लोकांच्या पातळीला उतरायला माझ्याकडे वेळही नव्हता आणि तशी इच्छाही नव्हती. मी काहीतरी रीऍक्ट करावं आणि त्यांना मला बडवायला निमित्त द्यावं हीच त्यांची अपेक्षा होती.

डोक्यात प्रचंड नपुंसक संताप घेऊन मी घरी आलो. दिवसभर माझी चिडचिड होत होती.

दुसऱ्या दिवशी मी परत त्या टपरीसमोरून चाललेलो असताना पुन्हा एकदा माझ्या नावानं शिव्या आल्या. परत एकदा माझा दिवस खराब झाला होता. तुफान चिडचिड होत होती. घरी पोचलो आणि एक मोठा श्वास घेतला. शांतपणे विचार केला. लहानपणी आई मला नेहमी सांगायची ते आठवलं ... "लोक आपल्याला काय बोलतात यापेक्षा आपण त्याला किती महत्व देतो हे महत्वाचं".

दुसऱ्या दिवशी मनाचा एक निश्चय करून बाहेर पडलो. मुद्दामच त्या टपरीच्या समोरून चालत गेलो. अपेक्षेप्रमाणे माझ्या नावानं शिव्यांची लाखोली ऐकू आली. मी निग्रहानं चेहरा कोरा ठेवून शांतपणे तिथून पुढे गेलो. दहा मिनिटांनी परत त्याच रस्त्यानं आलो. परत एकदा शिव्या आल्या. पण यावेळी त्यातला जोर किंचित कमी झाल्याचं जाणवलं आणि मला लक्षात आलं कि आपली मात्रा लागू पडतीये!

पहिल्या दिवशी त्या शिव्या येत असताना चेहरा कोरा ठेवण्यासाठी मला बराच अभिनय करावा लागला होता. पण दुसऱ्या दिवसापासून मी ते चक्क "एन्जॉय" करायला सुरुवात केली! बाहेर पडलो की आवर्जून मी त्या टपरीसमोरून जायला सुरुवात केली. आता तर तिथून जाताना आपोआप माझ्या ओठांवर एक स्मितहास्य यायला लागलं, कारण आता माझं आधीचं फ्रस्ट्रेशन त्यांच्या चेहऱ्यांवर मला दिसायला लागलं होतं! आपल्या शिव्या आणि चिडवण्याचा समोरील व्यक्तीवर कोणताही परिणाम होत नाही म्हणल्यावर त्यात काही मजाच रहात नाही ना!

पुढच्या २ दिवसांत मी मुद्दाम कमीतकमी दहा-पंधरा वेळा त्या टपरीसमोरून गेलो असेन. लवकरच ती सगळी रिकामटेकडी टाळकी माझा नाद सोडून त्यांच्या नेहमीच्या चकाट्या पिटण्यात गुंतली.

त्यानंतर काही वर्षांत स्वतःचा फ्लॅट घेऊन त्या वाड्यातून बाहेर पडलो आणि परत त्या वाड्याचं आणि तिथल्या लोकांचं तोंड पाहिलं नाही. पण माझी ही  "गांधीगिरी" माझ्या चांगलीच लक्षात राहिली!

Top

My Gandhigiri


This story is from the 20th century (which ended only 18 years ago). Before 2000, me and my family used to live in a run down, ramshackle old wada in the old part of Pune.  And it was not only the building that was outdated and dirty. Competing with that was the mindset of people around me, who had no aspirations, no goals in life, and plenty of time in their hands.


The life was worse than living in a slum. I will write about that sometime later. But for now, I want to share a story about my “Gandhigiri” for which I am still proud.


Many of my neighbors were of the type who judged a person not from his conduct, or character, but from his surname. And they had plenty of hatred for my surname!


Among those morons, there was a special moron. He had a very special hatred for me. He was older to me by 7-8 years. His main job was to spend his father’s money on booze, and to prove his manliness by regularly beating up his wife. His side job was to start unprovoked quarrels with us by abusing us (and our caste) in the choicest of words. And this abuse would start any time of the day or night, because he had all the time in his hands, being jobless.


One day, as I had just returned from college and getting ready to have my lunch, the abuses began. This time, the abuse included some choicest words about my mother. My temper hit the roof and I ran out to confront him. This is just what he wanted. He physically assaulted me. I hit back, very hard. Shortly after that, his mother came running to pacify him and forced him inside the house.


Two of three days past this incident, I went to a shop nearby my house. This was a small shop on one side of the road. On the other side of this road, about 20-25 feet away, was a paan shop, which belonged to the father of the moron mentioned above.


As I was talking to the shopkeeper, I realized that my name was being called out. I turned back to see who was calling me. And there he was, with a bunch of his friends, sitting near the paan shop, hurling abuses at me.


Once again, I had a strong urge to confront him and even thrash him. But I knew that this is exactly what they wanted. They were more than five goons, while I was alone. Most importantly, none of these goons had any career and future prospects or any goals. They had nothing to lose, while I had a lot!


So, I turned back and headed home, my head throbbing with impotent anger.


A couple of days after this incident, I walked the same street again, and came across the same gang, who promptly started hurling abuses at me. I was again furious, but could do nothing.


When I came back that day, I was close to breaking down. I was afraid even when going out of my house. And I could foresee no end to this abuse until I gave them a chance to thrash me.


Or was there?


Yes, there would be, if I could think out of the box and showed some restraint.


Next day, I came out, head high, and walked straight past the paan shop where the dreaded gang was sitting. As expected, when I reached the paan shop, there was a slurry of abuses thrown at me. I kept walking with a slight smile on my face (which was extremely difficult in the face of such abuse, mind you).


Exactly 10 minutes after this, I made it a point to again walk in front of the paan shop, with a smile on my face. Again I heard the abuses, but could sense the enthusiasm slipping a bit. This was hint enough for me.


From that day onwards, wherever I would go, I would make it a point to walk in front of the paan shop with my head high and a smile on my face. Within a couple of days, the goons got increasingly frustrated with my attitude. I could see it clearly on their faces. Soon, they lost all interest in me, and started ignoring me when I approached the shop.


In a few years past this incident, we left that wada and its “culture” behind us for good, but I am still proud of this Gandhigiri of mine, executed when even the word “Gandhigiri” was not invented yet.

Tuesday, December 26, 2017

शब्दचित्रं - रंगीबेरंगी





काही वर्षांपूर्वी मधुर भांडारकरनं दिग्दर्शित केलेला "फॅशन" हा चित्रपट बघण्यात आला. मधुर भांडारकरचे २-३ चित्रपट मी पाहिलेत. माझ्या मते त्याचा एक सेट फॉर्म्युला आहे.

१. एक कोणताही चटपटीत विषय निवडायचा.
२. त्या विषयाशी संबंधीत गेल्या ५-६ वर्षांत आलेल्या सनसनाटी बातम्या गोळा करायच्या. उदाहरणार्थ - "फॅशन"मध्ये आलेला कंगना राणावतचा भीक मागण्याचा सीन. मग त्या या ना त्याप्रकारे चित्रपटात घुसवायच्या.
३. ठरवलेल्या विषयाशी संबंधित सगळ्या "स्टिरिओटाईप" गोष्टी खच्चून भरायच्या. उदाहरणार्थ - "फॅशन"मधले सगळे पुरुष डिझायनर्स "गे" असतात, आणि सगळे "गे" पुरुष बायकीच असतात! "पेज थ्री" मधली सगळी मंडळी केवळ आणि केवळ त्याच जगात जगत होती.  त्यांना दुसरं काही आयुष्यच नव्हतं.

मी या चित्रपटाबद्दल जे काही वाचलं होतं, त्यामध्ये हा "स्टिरिओटाईप"चा मुद्दा सगळ्यांनी आवर्जून मांडला होता, पण त्या सीनमधून आपल्या भारतीय समाजातला एक भयानक "स्टिरिओटाईप" व्यक्त झालाय, तो कुणालाच खटकलेला मी पाहिला नाही.

मेघना माथुर उर्फ प्रियांका चोप्राची नैतिक आणि व्यावसायिक घसरण सुरु झाल्यानंतरचा हा सीन आहे. ती परत तिच्या आईवडिलांकडे जाण्याच्या जस्ट आधीचा. मेघना एका पार्टीमध्ये जाते, तिथे दारू आणि ड्रग्स घेते, डान्सफ्लोअरवर एका अनोळखी पुरुषासोबत लगट चालू करते, आणि पुढच्या सीनमध्ये जेव्हा ती जागी होते तेव्हा ती त्याच्याबरोबर हॉटेलरूममध्ये असते. तिच्या लक्षात येतं की आपण या अनोळखी व्यक्तीसोबत "झोपलो" होतो. तिला स्वतःचा प्रचंड तिटकारा वाटतो आणि ती तडक मुंबई सोडून घरी जाते.

बहुतेक सगळ्या प्रेक्षकांना यामध्ये काहीही गैर वाटलं नाही. "वन नाईट स्टॅन्ड" ही आपल्याकडे तशी तिरस्कारानं बघितली जाणारी आणि अनैतिक समजली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे हा भाग तिच्या नैतिक घसरणीचा भाग म्हणून मधुरनं  हुशारीनं वापरला आहे. पण त्याचबरोबर खास भारतीय प्रेक्षकांवर त्याचा जोरदार परिणाम होण्यासाठी त्यानं अजून एक बारकावा वापरला आहे. ज्या पुरुषाबरोबर मेघना झोपते तो एक आफ्रिकन काळा माणूस असतो . भारतीय प्रेक्षकांच्या भाषेत "कल्लू", एकदम "undesirable" मटेरियल! ती "अशा" माणसाबरोबर सेक्स करते! म्हणजे तिची चांगलीच घसरण झालीये! काही चॉईसच राहिला नाहीये!अर्थातच प्रेक्षक तिचा स्वतःबद्दलचा तिरस्कार समजून घेतात.

आता कल्पना करा की हाच वन नाईट स्टॅन्ड मेघनानं एखाद्या गोऱ्या माणसाबरोबर साजरा केला असता तर? निदान भारतीय प्रेक्षकांवर तरी एवढा त्याचा परिणाम झाला नसता ! मनातल्या मनात अनेक लोकांच्या दृष्टीनं तिचा हा नैतिक अपराध न होता तिची achievement झाली असती! गोऱ्या रंगाबद्दल आणि माणसांबद्दल भारतीय समाजात एकीकडे असणारी असूया आणि दुसरीकडे स्वतःच्या रंगाबद्दलचा न्यूनगंड सगळं बॉलीवूड व्यवस्थित वापरून घेतं. मग आपले नायक २०-३० गोऱ्या एक्सट्रॉ बायकांच्या घोळक्यात युरोपातल्या कुठल्यातरी शहरात समूहनृत्य करतात आणि तमाम पुरुष प्रेक्षकांचा अहं सुखावतो. बघा बघा आपले हिरो कसे गोऱ्या बायकांना नाचवताहेत!

त्याचवेळी काळ्या रंगाबद्दलचा आणि लोकांबद्दलचा तिरस्कार या अशा प्रसंगांतून ठळकपणे समोर येतो. आपल्या चित्रपटांमधले गुंड आणि दुष्ट लोक सहसा काळेच असतात. पौराणिक कथांमधले राक्षस काळेच असतात. अपवाद विभीषणासारखे राक्षस, जे सुष्ट शक्तींची मदत करतात! ज्या "अमर चित्र कथा" वाचत आम्ही मोठे झालो आणि पुराण आणि इतिहास शिकलो त्यामध्येही सगळे देव गोरे आणि राक्षस काळेच असायचे. इंग्रजांनी हे ओळखून हुशारीनं उत्तर-दक्षिण,आर्य-द्रविड फूट पाडण्याचं राजकारण केलं, आणि आजपर्यंत आपल्या राजकारण्यांनी त्याला खतपाणी घातलं.

आता आपल्या न्यूनगंडाला खतपाणी घालायचं काम फेअर अँड लवली सारख्या कंपन्या करतात. भारतात सौंदर्यप्रसाधनांच्या मार्केटमध्ये गोरं बनवणाऱ्या (म्हणजे तसा दावा करणाऱ्या) क्रीम्सचा वाटा अक्षरशः हजारो कोटींचा आहे!

जेव्हा मी प्रथम परदेशी गेलो (आणि तेसुद्धा "ओरिजिनल" गोऱ्यांच्या देशात!) तेव्हा इतर सर्व लोकांप्रमाणे मलाही या लोकांच्या गोऱ्या रंगाबद्दल उत्सुकता होती. पण जेव्हा मी या लोकांना जवळून पाहिलं तेव्हा आपल्या "ब्राऊन स्किन" ची किंमत मला समजली! या लोकांची गोरी त्वचा अत्यंत नाजूक असते. त्यावर बरेचदा अनेक डाग असतात. फार थोड्या लोकांची आपल्यासारखी नितळ त्वचा मी पाहिली. आमच्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या एका माणसाचे थोड्या उन्हात गेला तरी कसे हाल व्हायचे ते मी पाहिलंय. आपल्या दृष्टीनं कोवळ्या असलेल्या उन्हानं सुद्धा त्याची त्वचा भाजलेल्या बटाट्यासारखी झालेली होती.

या गोऱ्या लोकांमध्ये त्वचेच्या कॅन्सरचं प्रमाणही बरंच असतं. कारण त्वचेला संरक्षण देणाऱ्या मेलॅनिनची कमतरता. आपल्यामध्ये ते भरपूर असतं. हयू जॅकमन या X-Men चित्रपटांत "वूलवेरिन" चा रोल करणाऱ्या अभिनेत्याची आत्तापर्यंत स्किन कॅन्सरची सहा ऑपरेशन्स झाली आहेत. हे एक उदाहरण झालं.

तिकडे लोकांना आपल्यासारख्या ब्राऊन त्वचेचं आकर्षण असतं. त्यासाठी ते तासनतास बीचवर उन्हात बसून त्वचा टॅन करतात, पैसे देऊन ultraviolet चेंबरमध्ये अंगावर रेडिएशन घेतात. आणि आपण आपल्याला आयत्या मिळालेल्या गोष्टींची किंमत न ठेवता फेअर अँड लवलीचा धंदा वाढवत बसतो!

गोऱ्या लोकांनी जगावर राज्य केलं ते त्यांच्या वंशाच्या श्रेष्ठत्वामुळे नाही, तर त्यांच्या तंत्रज्ञान आणि विजिगीषू वृत्तीच्या जोरावर. काळे आणि आपल्यासारखे लोक त्यांचे गुलाम झाले त्यामध्ये कुणाच्या रंगाचा कोणताही वाटा नव्हता हे आपण विसरलो. आजही हिटलरचे गोडवे गाणाऱ्या आपल्या समाजातल्या काही लोकांचा असा गोड गैरसमज आहे की हिटलरला अभिप्रेत असणारा आर्यवंश आणि आपला सो-कॉल्ड आर्यवंश सारखाच आहे.

खरंतर आपला आर्यवंश ही ब्रिटीश लोकांनी निर्माण केलेली कल्पना आहे, आणि हिटलरच्या मते असलेला आर्यवंश हा फक्त गोऱ्या लोकांचा होता. त्यामध्ये भारतीय लोकांना काडीची किंमत नव्हती. पण लोकशाहीमध्ये करण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे लोकशाहीला नावं ठेवणं आणि हुकूमशाहीचे गोडवे गाणं!

ज्या दिवशी आपण आपल्या रंगाच्या न्यूनगंडातून बाहेर पडू आणि सर्व प्रकारच्या आणि सर्व वर्णाच्या लोकांमध्ये सौंदर्य बघू शकू त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं आपली भारतीय संस्कृती आत्मसात केली असं अभिमानानं म्हणता येईल.


A few years ago, I happened to watch the Bollywood movie Fashion, starring Priyanka Chopra and Kangana Ranavat, and directed by Madhur Bhandarkar. 



I have watched a few of Madhur Bhandarkar directed movies and have observed a recurring formula:


1            -- Select a subject with big controversy potential (Fashion, Jail, Page 3 etc)


2            -- Find out the sensational news about the chosen subject in the past few years / decades, for example the begging scene by Kangana’s character, or her wardrobe malfunction in Fashion. Then make sure all these sensational parts are included in the movie, one way or the other.


3            -- Find out all stereotypes related to the subject and make sure these stereotypes are included. For example, all male fashion designers are gay and effeminate, all Page 3 celebrities are fake inside-out and they have zero awareness of outside world etc.



The reviews / comments I read about the movie Fashion have never failed to mention these stereotypes. However, all of them ignored the vilest stereotype indicated in one of the turning points in the movie. And I have not met anyone who noticed it while watching.



The scene I found very offending occurs during the period when Meghana Mathur, the character played by Priyanka in the movie, is on a rapid downward spiral in her personal and professional life. Meghana gets inebriated in a party and starts flirting with a stranger on the dance floor. In the next scene, she wakes up next to the guy in his bed in a hotel room. She realizes that she had just slept with this total stranger, and hates herself for stooping so low. She immediately packs her bags and gets back to her hometown.



Most of the spectators did not find anything offending in this scene. One Night Stand is still a frowned upon concept in most parts of India. So, the director used this scene cleverly to indicate the sense of moral decline in the protagonist’s life. But he used one more trick in the Bollywood cinema book, which work wonders in emotionally manipulating Indian audience! The guy with whom Meghana had sex was a black African origin guy. In other words, in the view of the Indian audience, he was undesirable, unsexy, Kallu guy! Her moral decline is prominently highlighted in the Indian mindset because she had sex with “such a person”.  



Now imagine if Meghana was shown to have woken up next to a Caucasian (white) guy next to her. Would most Indians see it as a moral decline or a conquest? The director is very much aware of our unhealthy attraction for white skin and our inferiority complex / hate for dark skin. He manipulates these feelings in abundance to convey his point. This is the same gimmick that drives our brown skinned male actors to gyrate on the tunes of copied western songs in western cities flanked by white western extras. These scenes serve a dual purpose. Catching eyeballs of brown and dark-skinned males eagerly devouring the Caucasian girls with their eyes, and soothing their inferiority complex by the seemingly dominating position of the male protagonist over these white females.



At the same time, our movies keep no stone unturned in vilifying the dark skin. Almost all villains, goons, monsters in the popular culture are dark skinned. All demons in the mythological TV serials are dark skinned, except some demons like Ravana’s brother Vibhishan, who eventually defected to the good side! Even the Amar Chitra Katha comics, which was our main link to learning about our culture, showed all demons as dark skinned and almost all Gods as fair skinned. The British rulers understood and cleverly used this feeling against Indians to create one more division based on skin color (as if we did not have enough divisions like religions, castes and languages to fight over!). They cleverly sowed the seeds of Aryans vs Dravidians struggle, which is still a ripe fruit for politicians to pluck and devour!



If the moviemakers and politicians are making hay while the skin color is a hot issue, why would the industrialists stay behind? Companies like Fair and Lovely are minting billions riding the Indians’ unhealthy obsession with white skin.



When I went abroad the first time (that too, in the “original” Firangi land), I had curiosity, just like most of the Indians, about the white skin of those people. But up close, I really understood the value of our brown skin. Sometimes, we take things given to us by birth for granted, including our brown skin. The white skin that we are so obsessed about is very sensitive and often, freckled and spotty. Rarely I saw the smooth, spotless skin that so many of us have. I have seen some people around me turning beet red even with a mild sun exposure, so sensitive was their skin.



The white skin is also more prone to skin cancer due to lack of melanine, the skin pigment responsible for protecting us from harmful ultraviolet rays. Hugh Jackman, a celebrity actor, who plays Wolverine in the X-Men movies, has undergone six surgeries for skin cancer treatment.

While we struggle to get a lighter skin, the people with lighter skin spend billions every year to tan and darken their skins! There’s a huge market in western countries for tan creams and UV tanning chambers. People flock to the beaches and sunbathe for hours in blistering heat, to achieve a brown skin, and we help companies like Fair and Lovely make billions because we hate our sturdy, resilient, beautiful brown skin!



Westerner ruled the world in twentieth century not due to their skin color, but due to their technological advances, focus and determination to win at all cost. We did not become their slaves due to our skin color, but due to our divisions, internal politics and short term vision.



I feel depressed when I see some so called educated people around me who profess that Hitler was our Aryan brother. Aryans is a concept created by and propagated by the British rulers to advance their “divide and rule” agenda. As per Hitler, the true Aryans did not include anyone who did not have white skin and a very specific set of facial and bodily features. His concept of Aryans never included Indians. So get over it already!



The day we let go of our complex about our skin color and learn to see beauty in all skin colors, we can call ourselves evolved and embracing the true Indian culture.
 

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...