Wednesday, March 18, 2020

आपली 'downmarket' मायबोली!

आज कारमध्ये कधी नाही तो रेडिओ लावला. त्या रेडिओ जोकर लोकांची धेडगुजरी भाषा आणि अखंड जाहिरातींचा मारा मला रेडिओपासून लांब ठेवायला पुरेसा असतो.

पण आज अगदीच थोड्या अंतरावर जायचं असल्यानं मी बाकी काही लावायचे कष्ट घेतले नाहीत आणि गाडी सुरु झाली तसा रेडिओ आपोआप चालू झाला.

रेडिओवर कोणत्यातरी 'तिखट' चॅनेलवर पुण्यातल्या कोणत्यातरी सराफी पिढीतील एकाची मुलाखत चालू होती.  त्यात RJ नं प्रश्न विचारला...

'आपल्यासारख्या पुण्यातल्या दुकानासाठी चक्क सलमान खानसारख्या स्टारने Brand Ambassador बनायला होकार दिला ही केवढी अभिमानाची बाब आहे  ना?'...

पुढचं उत्तर ऐकायला मी त्या चॅनेलवर थांबलोच नाही एवढी मला त्या प्रश्नानं शिसारी आली!

सलमान खानबद्दल मला काहीच बोलायचं नाही. त्याच्या अनेक 'पराक्रमां'नंतरही त्याचे एवढे डाय हार्ड फॅन असलेले पाहून मला त्याच्याबद्दल अतीव आदर निर्माण झाला आहे! पण मला त्या RJ च्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं. एक हिंदी अभिनेता (!!!) एका मराठी दुकानाचा Brand Ambassador बनून जणूकाही त्याच्या 'लेव्हल' च्या खाली येऊन मोठे उपकार करतोय असा त्या प्रश्नात भाव होता.

आपल्याच मराठी लोकांचं स्वतःच्या 'लेव्हल' बद्दल जर असं मत असेल तर इतर भाषिक आपल्याला 'down मार्केट' समजतात त्याबद्दल बोंब तरी मारू नका. आपण स्वतःलाच इतरांच्या तुलनेत तुच्छ समजत असू तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची?

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...