Monday, December 30, 2019

Landmine Museum in Cambodia - कंबोडियातील भूसुरुंगांचं म्युझिअम


“We child soldiers got the guns and ammo from our army, but not the food. We had to scavenge for our own food, which we did by hunting in the night. Sometimes while hunting, we would come across the child fighters like us from the enemy camp. They would be searching for food, too, since even their army did not bother to feed them.

When we would meet, we would hunt together. Then we would dine together. After dinner, we played games with each other just like the ‘normal’ children of 10-15 years age-group would play.

Then the next day, we would kill each other!”

These words in the Landmine Museum in Siem Reap, Cambodia, chilled me to the bones.

I had an inkling of such a museum being present in Siem Reap. But I had not planned going there. This museum is situated on the way to the Bante Sri temple, which is a bit far-off from the other temples. I was dozing off in the Tuktuk since it was a long journey to Bante Sri and I was already tired by the half day sketching.

I do not know if it was a coincidence or divine intervention, but I woke up when the tuktuk was exactly in front of the landmine temple!

As I went to buy a ticket for the museum, I observed that the girl selling the ticket had her right hand missing from the elbow. This was a taste of the things I would see in the museum.

During the US-Vietnam war, Cambodia was caught in the crossfire, and was incessantly bombed by the US air force for ten continuous years. Hundreds of villages were razed to the ground, and millions of people became homeless. More than 5.5 million tons of bombs were showered on Cambodians during these ten long years.

Many of these bombs remain unexploded till now.

After the war was over, Cambodia was taken over by Khmer Rouge, a pro-communist organization headed by a monster, Pol Pot. During the reign of Khmer Rouge for the next twenty years, millions of Cambodians were forced into slave labor camps, tortured and murdered. Khmer Rouge was also responsible for laying millions of landmines around the borders of Thailand and Vietnam. Thousands of these landmines remained unexploded and added to the dangers of the village population.

The landmines that the Khmer Rouge planted were designed to mime, not to kill. The logic was simple: If you kill an enemy solider with a landmine explosion, the enemy still advances leaving the body behind. But if you manage to blow the leg off an enemy soldier, the wounded solider slows down the enemy.

So, when an unsuspecting child or a farmer accidentally touches an unexploded landmine, they lose a limb, or eyes to the blast. The ordinance can remain lethal for nearly a hundred years after it has been dropped.

The Landmine museum is a testament to the horrors Cambodians had to live through for nearly thirty-five years, and which some are still living through. This place was home to a former child soldier, Aki Ra. Aki Ra’s parents were killed when he was five, and he was forcibly inducted by Khmer Rouge as a soldier when he was just ten. When a war broke out between Khmer Rouge and Vietnamese army, Aki Ra defected to the Vietnamese army and fought Khmer Rouge.

After the war, Aki Ra adopted dozens of children who had became handicapped due to the exploding landmines. He helped them complete their education and get jobs. He dedicated his life to create awareness about the dangers of the landmines and draft a treaty banning the use of landmines throughout the world.

The museum also houses hundreds of pieces of artillery shells, unexploded landmines, disused guns and bullets. All this ammunition is diffused and is harmless today. But thousands of such pieces are still miming Cambodians in the remote villages.

After looking through the artifacts in the museum, I realized (yet again) how lucky I was to be born and raised in a country with an active democracy and freedom. I was lucky not to be caught in a civil war, not to be bombarded by a foreign country for a decade, and not to be rules by dictators. I am so lucky that I (or my children) do not have to watch every step we take in the fear of losing our limbs.

And I also realized how much we take our freedom, security and our rights for granted!












"आम्हां १०-१५ वर्षांच्या 'सैनिकांना' देण्यासाठी आमच्या सैन्याकडे बंदुका आणि गोळ्या चिकार होत्या, पण अन्नाची सोय मात्र आमची आम्हालाच करावी लागायची. त्यामुळे आम्ही रात्री-अपरात्री अन्नाच्या शोधात जंगलात जात असू. अन्न आणि शिकार शोधताना कित्येकदा आमची गाठ शत्रूच्या आमच्यासारख्याच बालसैनिकांशी पडायची. आम्हीही भुकेलेले, आणि तेही भुकेलेले. मग आम्ही सगळेजण मिळून अन्न शोधायचो. शिकार झाली की एका ताटात जेवायचो. मग एकत्र खेळायचो.

आणि दिवस उजाडला की आम्ही एकमेकांचे जीव घ्यायचो!"

कंबोडियाच्या 'Landmine म्युझियम' मधल्या पाटीवर लिहिलेले हे शब्द वाचताना माझ्या अंगावर काटा उभा राहिला.

सियाम रिपमधल्या या म्युझियमबद्दल थोडंफार माझ्या कानावर आलं होतं. पण हे बघणं माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं. हे म्युझिअम तिथल्या मुख्य देवळांपासून काहीसं दूर आडबाजूला आहे. बांते सराई नावाच्या एका देवळाकडे जाताना वाटेत ही इमारत लागते. या देवळाकडे जाण्यासाठी ४०-५० मिनिटांचा रस्ता होता. आधी एका देवळाला भेट देऊन मी मनसोक्त स्केचिंग केलं होतं. त्याचा आणि नंतरच्या जेवणाचा परिणाम म्हणून मला गाडीत डुलकी लागली.

आता याला योगायोग म्हणायचा की कुणा अज्ञात शक्तीकडून आलेला पुकारा म्हणायचा, पण मला गाढ झोपेतून अचानक जाग आली. उजवीकडे नजर गेली तर मी लॅन्डमाईन म्युझिअमच्या दारात!

तिकीट घ्यायला जसा तिकीटखिडकीकडे गेलो. तिकीट घ्यायला हात पुढे केला, तेव्हा लक्षात आलं की तिकीट देणाऱ्या मुलीचा उजवा हात कोपरापासून पुढे गायब होता. अशी हात-पाय गमावलेली लोकं कंबोडियात जागोजागी दिसतात.

अमेरिका आणि व्हिएतनामच्या युद्धात कंबोडिया पहिल्यांदा भरडला गेला. अमेरिकन हवाईदलानं सलग १० वर्ष कंबोडिया बॉम्बवर्षावानं भाजून काढला. शेकडो गावं या बॉम्बनी उध्वस्त केली. लाखो लोकं देशोधडीला लागले. साडेपाच लाख टनांपेक्षा जास्त दारुगोळा या १० वर्षांत कंबोडियावर टाकला गेला.

यातले कित्येक बॉम्ब फ़ुटलेच नाहीत, आणि ते कंबोडियामध्ये ठिकठिकाणी विखरून पडलेत.

व्हिएतनाम युद्ध संपल्यावर ख्मेर रूज नावाच्या एका कम्युनिस्ट संघटनेनं कंबोडियाचा ताबा घेतला. पॉल पॉट हा सैतान ख्मेर रूजचा नेता होता. पुढील वीस वर्षांत ख्मेर रूजने दहा लाखांपेक्षा जास्त बळी घेतले. उपासमार, जबरदस्तीनं लोकांनां अंगमेहनतीची कामं करायला भाग पाडणे, शारीरिक छळ आणि हत्याकांडं यामध्ये ख्मेर रूजने सगळे विक्रम मोडले.

ख्मेर रूजने व्हिएतनाम आणि थायलंडच्या सीमेवर लाखो भूसुरुंग पेरले. सुरुंगावर पाय पडून शत्रूचा सैनिक मेला तर त्याला मागे सोडून शत्रू आगेकूच करू शकतो. पण एखाद्या सैनिकाचा पाय तुटला तर त्याच्या शुश्रुषेमध्ये शत्रुसैन्याचा वेग कमी होतो. त्यामुळे हे सगळे भूसुरुंग अशा प्रकारचे आहेत की त्यावर पाय पडला तर माणूस मेला नाही पाहिजे, पण त्याचा पाय तुटून पडला पाहिजे!

दुर्दैवानं आजही यातील अनेक भूसुरुंग फुटता जमिनीखाली तसेच आहेत. आसपासच्या गावांमधील लहान मुलं किंवा शेतकऱ्यांच्या संपर्कात कधी ते आले तर हकनाक त्या लोकांना हात-पाय-डोळे गमवावे लागतात. हे सुरुंग शंभर वर्षांपर्यंत active राहू शकतात!

लॅन्डमाईन म्युझिअम हे कंबोडियाच्या जनतेचं जे अनन्वित नुकसान झालं (आणि आजही होतंय) त्याची आठवण राहावी या हेतूनं बनवण्यात आलं आहे. अकी रा नावाच्या एका माणसाचं हे आधी घर होतं.

अकी रा पाच वर्षांचा असतानाच त्याचे आई-वडील युद्धात बळी पडले. तो दहा वर्षांचा असताना त्याला ख्मेर रुजमध्ये भरती करून घेण्यात आलं. ज्या वयात शिकायचं आणि खेळायचं त्या वयात हातात बंदूक घेऊन अकि रा लढायला गेला. पुढे ख्मेर रुजने व्हिएतनामशी युद्ध छेडलं तसा अकि रा पळून जाऊन व्हिएतनामी फौजेला जाऊन मिळाला. 

युद्ध संपल्यावर अकि रा ने गावागावांमध्ये फिरून बॉम्ब आणि भूसुरुंगांच्या स्फोटांत हात-पाय गमावलेल्या डझनावारी मुलामुलींना दत्तक घेतलं, त्यांची या घरात राहण्याची सोय केली. त्यांना शिक्षण देऊन रोजगार मिळेपर्यंत त्यांचा सांभाळ केला. याशिवाय भूसुरुंगांच्या परिणामांबद्दल जगभर जागरूकता निर्माण करून भूसुरुंगांच्या वापरावर प्रतिबंध लागू करण्याच्या चळवळीसाठी त्यानं आयुष्यभर काम केलं.

या म्युझियममध्ये फुटलेले बॉम्ब, भूसुरुंग, तसेच व्हिएतनाम युद्धात वापरल्यागेलेल्या बंदुका, मशीनगन्स यांचा मोठा साठा आहे. हा सगळा दारुगोळा तिथे ठेवण्याआधी निकामी करण्यात आला आहे. पण दूरदूरच्या कंबोडियन खेड्यापाड्यांत अजूनही असा जिवंत दारुगोळा अनेकांना अपंग करतो आहे.

हे संग्रहालय पाहिल्यावर मला (पुन्हा एकदा) जाणीव झाली की आपण किती नशीबवान आहोत. मी एका स्वतंत्र आणि लोकशाही असणाऱ्या देशात जन्मलो. मला माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीही यादवी युद्धाचा सामना करावा लागला नाही. माझ्या गाव-शहरावर १०-१० वर्षं बॉम्बहल्ले झाले नाहीत, आणि माझ्या देशात कधी हुकूमशाही टिकली नाही.

मला आणि माझ्या कुटुंबाला भूसुरुंगाच्या भीतीनं घराबाहेर पाऊल टाकताना विचार करावा लागत नाही.

आणि मला सगळ्यात प्रकर्षानं ही गोष्ट जाणवली की या सर्व सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि आपले हक्क या गोष्टींना आपण किती गृहीत धरतो!

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...