Thursday, May 16, 2019

जो होता है, अच्छे के लिये होता है! - Everything Happens for the Best!

#बंड्याउवाच #शब्दचित्रं 

जो होता है, अच्छे के लिये होता है!


पूर्वी एक कथा वाचली होती... जे काही होतं ते चांगल्यासाठीच अशा आशयाची. अर्थात जेव्हा एखादी घटना घडते तेव्हां याचा परिणाम पुढे चांगलाच होणार आहे हे आपाल्याला माहित नसतं. कधीकधी चांगल्यासाठी होणारी एखादी घटना एखाद्या अप्रिय घटनेचं सोंग घेऊन येते.

कधीकधी ही अप्रिय वाटणारी घटना आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी कारणीभूत ठरते!

मागच्या एक-दोन आठवड्यांत या प्रकारची चांगलीच प्रचिती आली.


घटना #:

आमच्या ऑफिसतर्फे मला दोन महिन्यांसाठी लंडनला पाठवण्याची तयारी चालली होती. पुण्यातल्या कडक उन्हाळ्यातून लंडनच्या आल्हाददायक उन्हाळ्यात जाण्याची संधी फारच छान वाटली. लंडनमध्ये कुठंकुठं जाऊन पेंटिंग्स करायची, कोणत्या जागांना भेट द्यायची, इत्यादी बरेच मनसुबे चालू झाले होते.

ऑफिसमध्ये प्रवासासाठी लागणारी कागदपत्रं, अँप्रूव्हल्स यांची गडबड ऐन भरात होती. व्हिसासाठी - दिवसात अपॉइंटमेंट घ्यायची आणि ११ मे पर्यंत 'उडायचं' इतका प्रवास नजीक आला होता...

आणि अचानक कस्टमरकडून सगळ्या प्रवासांवर टाच आली. पुढची नोटीस येईपर्यंत कुणालाही लंडनला पाठवू नका असा फतवा निघाला. हातातोंडाशी आलेला प्रवास रद्द झाला!

आता मी काही प्रथमच भारताबाहेरच्या प्रवासाला निघालो नव्हतो, आणि लंडनलाही मी अनेकदा गेलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास रद्द होणं म्हणजे फार निराशेची गोष्ट नव्हती, पण नाही म्हणालं तरी मन जरा खट्टू झालंच. लंडनच्या सगळ्या बेतांवर पाणी पडलं होतं.

घटना #:
आमच्या घरी सध्या नवीन फर्निचर आणि घराच्या नूतनीकरणाचं काम चालू असल्यामुळे बऱ्याच नवीन-जुन्या वस्तूंचे शोध लागू लागले. ज्या वस्तू आम्ही कधीकाळी खरेदी केल्या होत्या, आणि कपाटात इतकी वर्षं गुडूप झालेल्या होत्या, त्या अचानक अवतीर्ण होऊ लागल्या. कित्येक वस्तू तर कशा आणि का आपल्याकडे आल्या याचंही कोडं उलगडलेलं नाहीये.

असंच एकदा एक कपाट उपसताना आम्हाला एक emergency light सापडला. बऱ्याच वर्षांपूर्वी घरी आलेला हा लाईट फारसा कधी वापरला गेला नव्हता. लावून पाहिला तर हा लाईट चालू स्थितीत होता. फक्त त्याची रिचार्जेबल बॅटरी चार्ज करण्याची गरज होती.

१३ तारखेला रात्री झोपताना आम्ही या emergency light च्या बॅटरीचा प्लग स्वयंपाकघरातल्या एका पॉइंटला चार्ज करायला लावला. सकाळपर्यंत बॅटरी चार्ज झाली की हा लाईट परत आत ठेवून देऊ असा आमचा विचार होता.

त्या रात्री का कोण जाणे, पण काही केल्या मला झोपच येत नव्हती. थोड्या वेळानं अक्षरशः चिडचिड होऊ लागली माझी. सकाळी लवकर उठायचं म्हणून गजर लावला होता, पण झोप हुलकावण्या देत होती.

रात्री पाऊणच्या सुमाराला स्वयंपाकघरातून खट्ट असा आवाज आला. आधी मला वाटलं की पोरांपैकी कुणीतरी स्वयंपाकघरात येऊन धडपडलं, त्यामुळे मी कान टवकारले. पण त्यानंतर कोणताच आवाज आला नाही. मी परत डोळे मिटले.

आणि एकदम माझ्या नाकाला रॉकेल जळाल्यासारखा एक सूक्ष्म वास आला. मला आता बेडमधून उठून परत झोप उडवण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण मला आतून काहीतरी जाणवलं आणि नक्की काय झालंय हे पाहण्याची प्रबळ इच्छा झाली.

काही सेकंदातच मी बेडरूमचा दरवाजा उघडून स्वयंपाकघरात धावलो, आणि समोरचं दृष्य बघून अक्षरशः हादरलो!

ज्या ठिकाणी तो रिचार्जेबल लाईट ठेवला होता त्या ठिकाणी धडधडून आग पेटली होती. त्याच्या शेजारच्या फूड प्रोसेसरनेही पेट घेतला होता. आसपासच्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या उष्णतेनं वेड्यावाकड्या झाल्या होत्या. आधीच्या ज्वाळा -. फूट वरच्या लाकडी कपाटाला खालून भिडल्या होत्या आणि ते कपाट कधीही पेटण्याच्या बेतात होतं!

तोपर्यंत अपर्णाही माझ्या मागोमाग स्वयंपाकघरात पोचली होती. दोघांनीही पटापट त्या आगीतून वाचलेल्या पाण्याच्या बाटल्या उचलल्या आणि त्या आगीवर रिकाम्या केल्या. सुदैवानं आग लगेच शांत झाली. पण प्लास्टिक आणि बॅटरीच्या जळण्यामुळे भयंकर घाणेरड्या वासाचा धूर घरभर पसरला होता. आम्ही घराच्या सगळ्या खिडक्या उघडल्या. हळूहळू सगळं वातावरण निवळलं, पण त्या धक्क्यानं झोप मात्र उडाली!

या प्रसंगातून आम्ही चांगलाच धडा शिकलो. जुन्या वस्तूंमध्ये फार मन गुंतवायचं नाही. जर वेळच्या वेळी तो लाईट फेकून दिला असता तर हि वेळ आली नसती.

आणि मग मनात विचार आला... जर का ऑफिसतर्फे ठरल्याप्रमाणे मी लंडनला गेलो असतो तर त्या रात्री मी घरी नसतो! आणि त्या रात्री माझ्याशिवाय कुणालाच आगीचा पत्ता लागला नव्हता. मग मी नसतो तर काय अनर्थ होऊ शकला असता! विचार करूनच थरकाप उडतो.

आणि मग परत एकदा पटलं... जो होता है, अच्छे के लिये होता है!

Everything Happens for the Best!


A few years ago, I had read a story. The moral of the story was the principle that whatever happens, happens for the better, even though we may sometimes dislike it when it’s happening.

Naïve as it may seem, I keep getting the experience of the truth of this principle again and again. The latest incident proving this principle once again happened this week, and it saved mine and my family’s lives!


Incident #1:

I was all set to travel to London for a couple of months due to my office work. Summer is the worst season in Pune and the best season in London. So I was looking forward to spending my summer there. I had also planned on sketching various London landmarks and visiting many museums. The plan for spending two months in London was all set.

In the office, I was busy filling out documentation, submitting various forms, and preparing for the logistics. I was supposed to complete the visa formalities and reach London on 11th of May.

And then the client applied a freeze over all onsite travel and told me to hold my travel indefinitely!

I was not exactly devastated after this news. I have travelled to London numerous times, so it was not exactly a novelty or a chance of a lifetime for me. But still, I was a little disappointed. But I decided to take it in my stride (as if I had a choice in the matter!).


Incident #2:

A great deal of renovation is currently going on in our house. When such things happen, we are forced to look through the stuff we have accumulated over the years and take a stock. In the process, we start discovering so many articles that we had somehow acquired. Most of the times, we find it hard to recall how these articles landed in our homes at the first place.

We came across one such device while emptying a cupboard marked for demolition. This was an emergency LED light with a built-in rechargeable battery. We had hardly used it during its multi-year presence in our household. But when we tested it, it worked. So, we decided to keep it.

We thought that we would fully charge the battery overnight and then keep the device shelved properly. So, we connected the device to the electrical socket on the kitchen top before retiring for the day. This was the night of the 13th May.

That night, I was somehow finding it very hard to sleep. The mind was flooded with useless and irrelevant thoughts and sleep was constantly eluding me. This was getting very irritating for me. I wanted to wake up early the next day and had even set up an alarm. But how was I supposed to wake up refreshed if I could not sleep on time?

Around 12:45am,I heard a small popping sound from the kitchen. It sounded like the closing of door of a microwave oven. My first thought was that one of my kids must have walked inside the kitchen and stumbled in the dark. However, I did not hear any sound following the initial pop, and I started relaxing.

That’s when the smell hit me.

I could smell something burning.

Within a few seconds, I had burst out of the bedroom into the kitchen. The sight in the kitchen had me absolutely stunned.

The place where the LED light had been kept was up in flames. The flames had already risen more than two feet and had engulfed the adjoining food processor. The flames were licking the bottom of the wooden cupboard holding the glass crockery. Anytime, the fire would spread to the wooden cupboard, and then it would be unstoppable.

Hearing me burst out of the bedroom, my wife had followed me into the kitchen. We both quickly came to our senses and started emptying the drinking water bottles over the blaze. Fortunately, the blaze quickly subsided. But the house was filled with the toxic smoke from the burning battery and plastic parts. We opened all windows to let the fresh air come in. After a few minutes, the acrid smoke was gone.

We went back to the bed, but the sleep has left us, replaced by utter shock.

This was a hard lesson for us… never hesitate in getting rid of the old stuff in your house, particularly such items with old batteries.

But the real moment of revelation came when I thought…
What if my travel plan had gone through? On the night of the 13th May, I would be in London, and no one would detect the fire until it was too late! This thought alone is a stuff of the nightmares.

So even if the cancellation of the travel was unpleasant, it turned out to be the best thing that happened to me.

Everything happens for the best!

1 comment:

  1. Ouch! And oh wow! I hope tya divshi lottery cha ticket vikat ghetlas - it was your lucky day ;-)

    ReplyDelete

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...