Saturday, September 1, 2018

डेंग्यूचा डास आणि शिकलेली लोकं - Dengue Mosquito and Educated Folks

डेंग्यूचा डास आणि शिकलेली लोकं


काही दिवसांपूर्वी WhatsApp वर मला एक मेसेज आला. आजकाल डॉक्टर लोकांचं काम कमी करायला बरीच लोकं व्हाट्सअँपवर फुकट सल्ले देत सुटलेली असतात. त्यातलाच हा एक मेसेज.

सगळा मेसेज जरी मला आठवत नसला तरी त्यातला मला गदगदून टाकणारा भाग मला नक्की ठेवतोय. तो असा:

"आजकाल सगळीकडे डेंग्यूची साथ चालू आहे. त्यामुळे गुडघ्यापासून पायापर्यंत रोज खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल हे antibiotic आहे, आणि डेंग्यूचा डास गुढघ्याच्या वरती उडू शकत नाही. त्यामुळे या उपायानं डेंग्यूपासून संरक्षण होतं." या मेसेजच्या खाली कुठल्याश्या डॉक्टरचं नाव आणि हॉस्पिटलचं नावही ठोकून दिलेलं होतं.

हा मेसेज एका उच्चशिक्षित व्यक्तीकडून आला होता हे विशेष. आणि असेच मेसेजेस बघून आसपासच्या बऱ्याच उच्चशिक्षित लोकांनी पायाला तेलं लावायला सुरुवात केलेलीही मी पहिली. त्यामुळे मला काही प्रश्न पडले. कुणाकडे या प्रश्नांची उत्तरं असतील तर कृपया मला व्हाट्सअँपवर पाठवलं का?

. आपल्याकडे कीटकांचा अभ्यास करण्यासाठी जसे अभ्यासक्रम असतात तसे डासांच्या शाळेत माणसांचा अभ्यास होतअसेल का?

. तिकडे बालडासांना वडीलधारे डास माणसाच्या पायांबद्दल माहिती देत असतील का? (Birds अँड Bees education फॉर child डास वगैरे)

. माणसाच्या पायांचा गुढघा डासाला नेमका कसा दिसत असेल? गुढघ्याच्या लेव्हलला आल्यावर एकदम डासाच्या मेंदूत एखादा अलार्म वाजत असेल का?

. एखादा डास माणसाचा गुढघा ओलांडून चुकून वर गेला (चावट कुठचा!) तर त्याचा फाऊल बाकीचे डास कसा मोजत असतील? त्याला त्याबद्दल काय शिक्षा होत असेल?

. एखादी वयानं (आणि उंचीनं) मोठी व्यक्ती एखाद्या लहान बाळाच्या शेजारी उभी असेल तर या दोघांच्या गुढघ्यांच्या लेव्हलमधला फरक हे डास कसे ओळखतात?

. "गुढघ्याच्या खाली आणि वर" हे माप समुद्रसपाटीपासून मोजलं जातं, की आत्ता उभे आहोत त्या जमिनीपासून, की इमारतीच्या तळमजल्यावरून?

.  जर हे जमिनीपासून मोजलं जात असेल तर पहिल्या मजल्यापासून वरच्या लोकांना कधीच डेंग्यू होत नसेल का?

८. आजकाल अंडरग्राउंड पार्किंग असतात तिथे डोक्यापर्यंत सगळा एरिया डासाला चावायला मोकळा असतो का?

आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न :

. शाळेत आणि कॉलेजात "derivatives, integration, transistor" हे आणि असे अनेक तद्दन डोकेदुखी विषय (ज्यांचा आजपर्यंत कधीही उपयोग झाला नाही) आमच्या माथी मारण्यासाठी आमच्या शिक्षकांनी जेवढे कष्ट घेतले त्याच्या दहा टक्के कष्ट स्वतःची अक्कल वापरणे शिकवायला का नाही घेतले??


Dengue Mosquito and Educated Folks


Few weeks ago, I received a message on Whatsapp. Nowadays, Whatsapp has become the platform of choice for self-proclaimed doctors, who are out to shut down doctors’ practices with their free medical advice. This was one of those messages.

I don’t recall this message word by word, but the gist of the message was as follows:

“There’s an ongoing Dengue epidemic in our city. To prevent falling prey to this disease, one must take the following precaution:

The dengue mosquito cannot fly above the level of a person’s knee. So cover the part of your leg below the knee in coconut oil. Coconut oil is an antibiotic (!) and prevents these mosquitoes from biting”

Below this message was the name of a doctor and a hospital (which I am sure no one has checked under fact-or-fiction challenge).

Interesting fact is that this message was sent by a person who is at least a graduate. Even more interesting fact is that I could see many so called well-educated people taking this seriously!

But being always a skeptic with hyperactive (paranoid) imagination, this message got me thinking, and my thinking yielded some interesting questions.

If you have answer to these questions, please send me on WhatsApp only!

  1. Do mosquito schools have “human anatomy” as a study topic in their curriculum? 
  2. Does the “birds and bees” education in mosquito schools include the shape and length of human legs.
  3. How does a mosquito sense that he/she/it has reached the knee level of his/her/its target human? Is there an in-built alarm system is his/her/its brain?
  4. If a rogue mosquito crosses the knee barrier to enter the (ahem!) forbidden zone above, how is he/she/it penalized by his/her/its supervisors?
  5. If a fully grown adult and a small child are standing side by side, how do the mosquitoes manage the level difference between their knees?
  6. Is the knee level measured from sea level / ground level / building ground floor level?
  7. If the knee level is measured from ground level, the legs-below-knees of people on first floor onward are always above knee level. So does it make them immune to dengue forever?
  8. If the car park is underground, the whole person is technically below the knee level. Is the mosquito allowed to bite above the knee?

And the most important question:

9         9. Our schools, colleges and universities made us spend so much time and energy to learn concepts like derivatives, integration and what not, which would never be used again in our lives.

Then why didn’t they use that time to teach us the simple skill of HOW TO USE OUR BRAINS??

No comments:

Post a Comment

मुलींचे कपडे आणि NCB

परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...