Tuesday, November 28, 2017
Thursday, November 23, 2017
शब्दचित्रं - प्रायॉरिटीज
पण या सगळ्याची सुरुवात झाली ती एका अगदी वेगळ्याच प्रसंगातून. २००८ सालच्या आर्थिक मंदीमधून!
२००८ साली मी एका अशा IT कंपनीमध्ये काम करत होतो ज्यांची पूर्ण रोजी-रोटी बँका आणि फायनान्शिअल सर्विस क्षेत्रात होती. अमेरिकेपासून या क्षेत्रात जी पडझड चालू झाली ती बघता बघता सर्व जगात पसरली आणि मी ज्या प्रोजेक्टवर काम करत होतो तो अचानक एक दिवस बंद झाला. IT च्या भाषेत मी बाकड्यावर आलो! अर्थात कंपनीच्या दृष्टीनं ओझं झालो.
ओझं झालेल्या लोकांना तातडीनं बाहेर हाकलायचा झपाटा कंपनीनं लावला होता. त्यामध्ये कधी कुणाचा नंबर येईल याची कोणतीही शाश्वती नव्हती. कुणाच्या डेस्कवरचा फोन वाजू लागला कि लोकांना धस्स होई. ज्याचा नंबर आला असेल त्याला एका केबिनमध्ये बोलावणं येई. त्याच्यासमोर राजीनामापत्र ठेवण्यात यायचं आणि त्यावर सही करण्यास भाग पाडलं जायचं . सही करण्यास नकार दिला तर टर्मिनेशनची धमकी. मग एकदा सही झाली की एका सिक्युरिटीवाल्याला त्याच्याबरोबर त्याच्या डेस्ककडे पाठवण्यात येई, तो माणूस परत त्याच्या कॉम्प्युटरला हात लावत नाही ना हे बघण्यासाठी! हाकललेल्या माणसानं आपल्या वैयक्तिक वस्तू डेस्कवरून घ्यायच्या आणि सरळ बाहेरचा रस्ता धरायचा. असा सगळा दहशतीचा माहोल होता.
या कंपनीत आल्यापासून मी अक्षरशः गुलामासारखा राबत होतो. सलग ८-१० महिने दिवस-रात्र आणि वीकएंडसुद्धा कामात जायचा. स्वतःच्या आरोग्याचा आणि कौटुंबिक आयुष्याचा पूर्ण बळी देऊन दिवस-रात्र फक्त कंपनीचा आणि प्रोजेक्टचा विचार करत होतो. आणि आता तो प्रोजेक्ट अचानक संपल्यावर एवढं रिकामपण आलं की काय करावं सुचेना. दुसरा प्रोजेक्ट शोधायचा खूप प्रयत्न केला, पण मुळात सगळी इंडस्ट्रीच बुडालेली तर नवीन कामं कोण चालू करणार! गेले ८-१० महिने कंपनीसाठी मी फार महत्वाचा "resource" होतो, आणि आता अचानक मी त्यांच्यासाठी ओझं झालो होतो!
पण या रिकाम्या वेळेमुळे आणि चालू परिस्थितीमुळे मला स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळाला. माझ्या हे लक्षात आलं की शेवटी आपण कितीही राबलो तरी कंपनीच्या दृष्टीनं आपण "resource"च असतो. जसं टेबल, जसा लॅपटॉप तसा माणूस! त्यामुळे प्रोजेक्ट प्लॅन बनवताना मॅनेजर लोक इतर लोकांचा उल्लेख "people" म्हणूनसुद्धा करायला कचरतात, त्यांना ते "रिसोर्सेस"च म्हणतात! आणि त्यात बहुतेक लोकांना काहीही वावगं वाटत नाही.
तर या रिकाम्या वेळचा सदुपयोग करायचं ठरवून मी कुटुंबाबरोबर सहलीचा बेत ठरवला. ठिकाण ठरलं लक्षद्वीप. पॅकेजची चौकशी झाली. १-२ दिवसात पैसे भरायचे असं ठरवून मी ऑफिसला आलो. आणि मला माझ्या मॅनेजरकडून बोलावणं आलं.
पुढे काय झालं हे सांगण्याआधी या मॅनेजरबद्दल सांगणं आवश्यक आहे. कारण पुढचा माझा निर्णय त्याच्यामुळेच ठाम झाला. हा माझा मॅनेजर अशा पोझिशनला होता जिथे जाण्याची महत्वाकांक्षा घेऊन मी कंपनीमध्ये पाऊल टाकलं होतं. पण एक वर्ष या माणसाबरोबर दिवसरात्र काम करून मला एक गोष्ट लक्षात आली. जर कंपनीमध्ये याच्या लेवलला जाऊन हे असं आयुष्य होणार असेल तर मला त्या वाटेला जायचंच नाही. हा माणूस सकाळी ६ पासून फोनवर असायचा. मग ११ ला कंपनीमध्ये यायचा. रात्री १०-११ पर्यंत थांबायचा, आणि परत रात्री उशिरा क्लायंट कॉल्स!दिवस रात्र फक्त काम काम काम. आणि त्याच्या दृष्टीनं तेच आयुष्य होतं. असू देत. तेवढंच असतं तर मला काहीही प्रॉब्लेम नव्हता. पण या माणसाला वाटायचं की इतर लोकांनीपण असंच वागावं! आणि मला हे झेपायचं नाही. अर्थात या माणसाचे मी नेहमी मनापासून आभार मानतो. त्याच्यामुळे मला हे तरी समजलं कि आत्तापर्यंत मी चुकीच्या दिशेला जाण्यासाठी माझी शक्ती खर्च करत होतो. कधीकधी कुठे जायचं नाही हेसुद्धा समजणं महत्वाचं असतं!
तर मी माझ्या मॅनेजरसाहेबांच्या केबिनमध्ये गेलो आणि स्थानापन्न झालो. तोंडदेखल्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, आणि साहेबांनी मुद्द्याला हात घातला.
"लंडनमध्ये एक अर्जंट प्रोजेक्ट आहे. तिकडे एका "स्ट्रॅटेजिक प्रोजेक्ट"मध्ये मॅनेजर म्हणून त्यांना एक "रिसोर्स" पाहिजे. लगेच १०-१५ दिवसात ट्रॅव्हल करावं लागेल. You need to be available 24 x 7. आपल्यासाठी हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे. You will need to get involved and monitor. You can’t delegate and forget. It’s a high stress environment..... ". साहेब चालूच झाले! थांबेचना! ते सगळं IT चं जार्गन ऐकून एव्हाना मला शिसारी यायला लागली होती.
शेवटी साहेब एकदा श्वास घ्यायला थांबले आणि मी चान्स मारला. "ते सगळं ठीक आहे, पण नेमकं याच वेळात मी फॅमिलीबरोबर लक्षद्वीपला चाललोय".
साहेबांच्या कपाळावर आठ्या आल्या. "गाढवाला गुळाची चव काय" हि भावना क्षणभर त्यांच्या डोळ्यात तरळली. मग एक मोठा श्वास घेऊन ते म्हणाले .. "This is a one time opportunity. परत एकदा विचार कर आणि मला लगेच सांग. I have a lot of plans for you. ".
हे शेवटचं वाक्य ऐकलं आणि माझा निर्णय एकदमच पक्का झाला. कारण या माणसानं आजपर्यंत मला माझे काय प्लॅन आहेत हे कधीही विचारलं नव्हतं. कायम याचं एकच वाक्य ... I have plans for you. आणि हे वाक्य माझ्या सॉलिड डोक्यात जायचं . असं वाटायचं की कुणीतरी कठपुतळीसारखं आपलं आयुष्य नियंत्रित करतंय !
मी शांतपणे उठलो .. म्हणालो .. "I appreciate the opportunity, पण मी बुकिंग करून पैसे भरलेत, आणि आता रद्द केलं तर ते परत मिळणार नाहीत. त्यामुळे मी आता सुट्टी रद्द करू शकत नाही."
त्यानंतर ठरल्याप्रमाणे मी लक्षद्वीपला गेलो. आधीच मला पाण्याबद्दल unhealthy attraction आहे. त्यातून तिथले स्वच्छ पांढऱ्या वाळूचे बीचेस, पाचूसारख्या हिरव्या रंगाचं स्वच्छ पाणी बघून मी वेडाच झालो. तिथे एका बेटावर स्कुबा डायव्हिंगचा पहिला अनुभव घेतला आणि मी पूर्णच बाटलो ! आयुष्यात केवढी मोठी गोष्ट या Corporate rat race च्या नादात आपण मिस केली याची त्या दिवशी जाणीव झाली. पुढच्या वर्षी पुन्हा लक्षद्वीपला जाऊन मी स्कुबा डायव्हिंग शिकून घेतलं, आणि आता जमेल तेव्हा, जमेल तिथे मी डायव्हींग करतो. त्या नंतर अंदमान, दुबई आणि मागच्या वर्षी थायलंडला डायव्हिंग केलं. प्रत्येक ठिकाणी तो एक आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव ठरला (चांगल्या अर्थानं!).
आणि हो, एक सांगायचं राहिलंच.. लक्षद्वीपची सहल करून परत आल्यावर मला कळलं कि ज्या प्रोजेक्टसाठी माझी सुट्टी रद्द करायला साहेब टपले होते तो प्रोजेक्ट शेवटी आमच्या कंपनीकडे आलाच नाही. म्हणजे मी जर त्या प्रोजेक्टच्या भरवश्यावर माझी सुट्टी रद्द करून थांबलो असतो तर ना धड प्रोजेक्ट मिळाला असता, ना हे पुढचे सगळे अविस्मरणीय अनुभव! कधीकधी समोरची कॉर्पोरेट गाजरं नाकारून आपल्या आयुष्याच्या प्रायॉरिटीजचा विचार अवश्य करावा. शेवटी काय तर जिंदगी ना मिलेगी दोबारा !
Monday, November 6, 2017
बंड्या उवाच - स्ट्रीट हॉक
फार फार पूर्वीची गोष्ट. पुणे शांत शहर होतं, आणि दूरदर्शन हा एकच चॅनेल टीव्हीवर लागायचा इतक्या जुन्या काळातली.
त्या वेळी रविवारी टीव्हीवर अमेरिकेतून आयात केलेल्या काही मालिका लागायच्या. स्टार ट्रेकसारख्या काही मालिकांनी माझं भावविश्वच बदलून टाकलं. आपल्या इथले सिनेमे आणि मालिका किती ठराविक साच्यात खेळात असतात त्याची जाणीव करून दिली. पण अशा मालिकांबरोबरच काही तद्दन फालतू मालिकासुद्धा खपून गेल्या. त्यापैकीच एक म्हणजे Street Hawk.
तर या Street Hawk मालिकेचा एक "व्हिजिलांते" हिरो असायचा, बॅटमॅनसारखा. तो त्याच्या बाईकवरून सुसाट (मालिकेच्या लेखकाच्या मते ३०० किमी की मैल प्रतितास) वेगाने गुन्हा घडत असेल तिथे पोचायचा. त्याच्या त्या प्रवासाचं ते ठराविक एकच ऍनिमेशन सतत दाखवायचे. मग तो तिथे पोचला की एकदम हळू बाईक चालवायचा. मग गुंड त्याच्यावर गोळ्या झाडत. तो हिरो असल्यामुळे अर्थातच त्याला एकही गोळी लागत नसे. मग एक लुटुपुटुची लढाई व्हायची. ह्याच्या पण गोळ्या गुंडाना लागत नसत. पण ते घाबरून शरण येत. आणि मग पोलीस आले की आपला हिरो ३०० किमी की मैलच्या वेगानं आपल्या घरी परतत असे.
त्यावेळी रविवारी सकाळी करमणुकीसाठी ऍक्शनमध्ये जास्त पर्यायच नव्हते, त्यामुळे ही मालिकापण मी आवडीनं बघायचो. त्यावेळी Street Hawk म्हणजे फार म्हणजे फारच भारी बाईक असं मनात ठसलं होतं. अर्थात आमचा ग्रुप कट्टर पुणेकर मंडळींचा असल्यामुळे कोणतेही विशेषण काहीतरी वळवून, वाकवून आणि भरपूर कुचकटपणा मिसळून द्यायचं हे ठरलेलंच.
आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा येऊन जाऊन असायचा. आता त्याचं नावपण लक्षात नाही. त्याची एक अत्यंत जुनी मोपेड होती. कुठेपण रेस्टोरंटमध्ये जायचं ठरलं कि हा प्राणी उत्साहानं पुढे होणार आणि आमच्या बरोबर क्लासमधून निघणार. पण तिथं पोचणार मात्र हा सोडून सगळे. १-२ किलोमीटर जाताना कमीतकमी ३-४ वेळातरी याची मोपेड बंद पडणार. हा आला नाही बघून कोणीतरी हा कुठे कडमडला म्हणून परत जाणार. मग सगळे मिळून याची मोपेड चालू करणार. परत अर्धा किलोमीटर गेला की पुन्हा खरखर चालू! त्याच्या त्या मोपेडला आम्ही "स्ट्रीट हॉक" म्हणायचो!
तर सांगायचा मुद्दा हा की नंतर त्या पोरानं अचानक स्ट्रीट हॉकला तलाक दिला आणि सायकलवर हिंडायला लागला. कारण विचारलं तर सांगेना. खोदून खोदून विचारलं तरी यव नाही इ त्यंव नाही. मग इकडून तिकडून माहिती कानावर आली. कॉलेजात सगळेच भोचक असल्यामुळे अशा गोष्टी तशाही लपत नाहीत.
तर झालं असं होतं, की हा प्राणी एकदा त्याच्या स्ट्रीट हॉकवरून एका झोपडपट्टीवजा वस्तीतून चालला होता. त्यावेळी एक नतद्रष्ट कोंबडं त्याच्या मोपेडच्या खाली आलं. लोकं जमा व्हायला लागले तशी याची टरकली. स्ट्रीट हॉकला किक मारून साहेब निघाले कि जोरात. आणि इथेच कहाणीमध्ये "ट्विस्ट" आला! चिडलेल्या लोकांनी चक्क पळत पळत येऊन त्याला चालत्या गाडीवर गाठलं आणि धुलाई केली! त्याच क्षणी साहेबांनी स्ट्रीट हॉकला तलाक दिला.
या प्रकारामुळे त्याची जरी चिडचिड झाली होती तरी हा किस्सा ऐकून आमची चांगलीच करमणूक झाली, आणि या एका प्रकारामुळे स्ट्रीट हॉक मालिका चांगलीच लक्षात राहिली !

Subscribe to:
Posts (Atom)
मुलींचे कपडे आणि NCB
परवा फेसबुकवर भिंतींना तुंबड्या लावत बसलेलो असताना माझ्या मित्रयादीतील एकाची पोस्ट पाहिली . सध्या बॉलीवूडमध्ये ड्रग्सवरून जे ...
-
Last week, the supreme court of India announced a landmark verdict quashing the 150 years old adultery law. As expected, it attracted...
-
मागच्या आठवड्यात श्रीनगर - लेह - लडाख सहल झाली. तिथली थंडी , अफाट डोंगरदऱ्या , विरळ हवा , निसर्गाशी माणस...
-
“Follow your passion” is the new-age mantra we hear all around us. “Don’t chase after money”, “Don’t waste your life in a nine-to-...